५ सप्टेंबर २०२३ चा हवामान अंदाज महाराष्ट्र | 5 September Weather Report Maharashtra

५ सप्टेंबर २०२३ चा हवामान अंदाज 

गेले अनेक दिवस पावसाने महाराष्ट्राकडे कानाडोळा केलाय. संपूर्ण महाराष्ट्रभर ऑगस्ट महिना कोरडाच गेला. कोणत्याही जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस बरसला नाही. यामुळे शेतकऱ्यांसोबतच सर्वांचीच काळजी वाढलेली होती. मात्र सप्टेंबर महिन्याची सुरुवात महाराष्ट्रासाठी आशादायी राहील असा अंदाज महाराष्ट्राच्या हवामान शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने या संबंधित सविस्तर अंदाज नुकताच जाहीर केला . या नवीन हवामान अंदाजानुसार उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे आणि उत्तर कर्नाटकात नवीन चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे सध्या महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे.

जिल््हा कमाल तापमान (°से) किमान तापमान (°से) हवामान पाऊस (%)
अकोला 29 23 बऱ्याचदा ढगाळ 40%
अमरावती 28 22 अर्धवट ढगाळ 20%
बुलढाणा 28 22 बऱ्याचदा ढगाळ 40%
चंद्रपूर 30 24 बऱ्याचदा ढगाळ 50%
गडचिरोली 27 21 बऱ्याचदा ढगाळ 60%
हिंगोली 28 22 बऱ्याचदा ढगाळ 30%
जळगाव 29 23 बऱ्याचदा ढगाळ 40%
कोल्हापूर 29 23 बऱ्याचदा ढगाळ 30%
लातूर 28 22 बऱ्याचदा ढगाळ 40%
नागपूर 29 23 बऱ्याचदा ढगाळ 40%
नाशिक 28 23 बऱ्याचदा ढगाळ 30%
उस्मानाबाद 28 22 बऱ्याचदा ढगाळ 40%
पुणे 28 23 बऱ्याचदा ढगाळ 30%
रायगड 29 23 बऱ्याचदा ढगाळ 40%
रत्नागिरी 29 24 बऱ्याचदा ढगाळ 50%
सांगली 28 22 बऱ्याचदा ढगाळ 30%
सातारा 28 23 बऱ्याचदा ढगाळ 30%
सिंधुदुर्ग 29 24 बऱ्याचदा ढगाळ 50%
वर्धा 28 22 बऱ्याचदा ढगाळ 40%

 

या घटकांमुळे राज्यांमध्ये आता पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लवकरच धो धो पाऊस बरसायला सुरुवात होईल असा अंदाज आहे. तसेच उद्यापासून म्हणजेच 5 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान  राज्यामधील मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा व विदर्भ या 3 विभागांमध्ये चांगला समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील तब्बल 22 जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवली आहे.


महाराष्ट्र कृषी बातम्या


कोणत्या जिल्ह्यात पडेल जोराचा पाऊस?

 उद्या अर्थातच 5 सप्टेंबरला राज्यामधील दक्षिण कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये पावसाची दाट शक्यता आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा ,कोल्हापूर या जिल्ह्यात पाऊस पडेल असा अंदाज आहे व यासोबतच मराठवाड्यातील  लातूर , नांदेड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज असून विदर्भामध्ये गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली ,वर्धा ,नागपूर या जिल्ह्यातही जोराचा पाऊस पडेल असं सांगण्यात येत आहे.

५ सप्टेंबर २०२३ चा हवामान अंदाज महाराष्ट्र

6 सप्टेंबरला उत्तर कोकणामधील ठाणे दक्षिण कोकण मधील रत्नागिरी ,सिंधुदुर्ग, रायगड तर मध्य महाराष्ट्रातील पुणे ,सातारा, कोल्हापूर मराठवाड्यातील जालना, हिंगोली ,परभणी विदर्भातील बुलढाणा, वाशिम ,अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पावसाची सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवली आहे.

Leave a comment