माझे शहर, माझी जबाबदारी अंतर्गत धुळेकरांच्या सेवेसाठी भव्य डिस्काउंट ॲप..

कारगील विजय दिवसाचे व महाराष्ट्र राज्याचे लाडके उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवस सेवा सप्ताहचे औचित्य साधून डिस्काउंट ॲपचे आज धुळे शहराचे भाजपा विधान सभा निवडणूक प्रमुख अनुप भैय्या अग्रवाल यांच्या हस्ते अनावरण….

 ‘माझे शहर,माझी जबाबदारी’ डिस्काउंट देणाऱ्या स्वतंत्र ऍपचे लोकार्पण …
 धुळेकरांच्या सेवेत पूर्णपणे मोफत समर्पित ऍप …
 हॉस्पिटल मध्ये ओपीडीवर २५% तर ऍडमिट केल्यावर बिलात २० ते ३० टक्के पर्यंतचे मिळणार डिस्काउंट…
 धुळेकरांसाठी खुशखबर : स्वतंत्र अँपमुळे आता खरेदीची चिंता होणार कमी :- अनुपभैया अग्रवाल यांच्या पुढाकाराने मिळणार डिस्काउंट कार्ड

धुळे I प्रत्येकाला दररोज कुठे न कुठे, कोणती न कोणती वस्तू खरेदी करावीच लागते. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसोबतच आरोग्याच्या समस्यांमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणे, मेडिसिनवर अमाप खर्च होणे, हे सारे टाळता येणारे नाही. परंतु धुळे महानगरीत सर्वसामान्य नागरिकांची हि मूलभूत अडचण विचारात घेता अनुप अग्रवाल यांनी ही चिंता बऱ्याच प्रमाणात कमी करण्याची अनोखी शक्कल लढवून स्वतंत्र ऍप डिझाईन केले आहे. या ऍपच्या माध्यमातून धुळेकरांना सेवा व खरेदीवर भरघोस डिस्काउंट मिळणार आहे. आजपासून हे ऍप धुळेकरांच्या सेवेत समर्पित करीत असून विशेष म्हणजे हे ऍप पूर्णपणे मोफत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले आणि मूलभूत नागरी सुविधांसह विकासाच्या नवनवीन संकल्पना अमलात आणणारे अनुप अग्रवाल यांनी एक अफलातून सुविधा अमलात आणली आहे. सर्वसामान्य धुळेकरांचा विचार करून ‘माझे शहर,माझी जबाबदारी’ या उक्तीला बांधील राहून डिस्काउंट देणाऱ्या स्वतंत्र ऍपचे आजपासून लोकार्पण केले.
धुळे शहरातील वेगवेगळे व्यापारी, व्यावसायिक आणि सेवा देणाऱ्या बांधवानी धुळेकर जनतेसाठी डिस्काउंट देणे मान्य केले. अजूनही बरेच जण डिस्काउंट देण्यासाठी तयार आहेत. यापेक्षा मोठ्या सन्मानाची बाब काय असू शकते? या साऱ्यांचे अनुप अग्रवाल यांनी आभार मानले आहेत.
कसे आहे नेमके हे ऍप –
————————
धुळेकरांना डिस्काउंट देणारे हे ऍप वापरणे अगदी सोपे आहे. आपल्या मोबाईलमध्ये एक लिंक येईल ती ओपन करून ग्राहक म्हणून त्यात स्वतःचे नाव, मोबाईल नंबर, वय, पत्ता अशी प्राथमिक माहिती भरताचं आपला संपर्क आपोआप अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयाशी होईल आणि तेथे नोंद झाल्यावर आपल्या मोबाईलवर परत या संदर्भातील युजर नेम पासवर्डचा मेसेज येईल. आपण मोबाईलमध्ये पासवर्ड टाकताच हे ऍप ऍक्टिव्ह होईल. त्यात वेगवेगळ्या व्यावसायिकांची, हॉस्पिटलची यादी दिसेल. कुणाकडे किती डिस्काउंट मिळेल हे ही त्यात दिसणार आहे. हॉस्पिटल किंवा दुकानात जाऊन ऍप ओपन करायचे. त्यात अनुप अग्रवाल यांच्या नावाचे स्कॅनकोड स्टिकर लावलेले असेल. त्यावरचा बारकोड ऍपमध्ये स्कॅन केल्यास आपणास डिस्काउंट सुविधा मिळेल.
असे होतील ऍपचे फायदे
————————–
या ऍप मध्ये सध्या शहरातील शंभराहून अधिक व्यावसायिक आणि काही हॉस्पिटल्स समाविष्ट आहेत. जसे, टेस्टिंग लॅब, क्लिनिक्स, किराणा दुकान, हार्डवेअर, फुटवेअर, कॉस्मेटिक, डेअरी प्रोडक्ट, बेकरी, इत्यादींचा समावेश असून त्यांच्याकडे आपल्या ऍपमुले १०% ते ३०% पर्यंत डिस्काउंट मिळेल काही हॉस्पिटल मध्ये ओपीडीवर २५% तर ऍडमिट केल्यावर बिळात २० ते ३० टक्के पर्यंतचे डिस्काउंट मिळणार आहे. यामुळे धुळे शहरातील सामान्य कुटुंबांची हजारो रुपयांची बचत होणार आहे.
केवळ राजकीय हेतू न ठेवता आपण या शहराचे आणि इथल्या नागरिकांचे देणं लागतो या विधायक भावनेतून अनुप अग्रवाल यांनी हे डिस्काउंट देणारे अनोखे ऍप धुळेकरांच्या सेवेत दाखल केले आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

 

Leave a comment